सावधान: डेटा एंट्री जॉब फ्रॉड, वर्क फ्रॉम होम जॉब, जाणून घेऊया एडवोकेट अंकिता रा जयसवाल यांच्या कडून संपूर्ण लेख मधे.... ©️®️ - न्याय का ज्ञान

Legal & Social Awareness

Breaking

Home Top Ad

Legal Awarness Talk by Adv. Ankita R Jaiswal fb page, nyaykagyan.Blogspot.com

Post Top Ad

Responsive Ads Here

कुल पेज दृश्य

शनिवार, 5 जून 2021

सावधान: डेटा एंट्री जॉब फ्रॉड, वर्क फ्रॉम होम जॉब, जाणून घेऊया एडवोकेट अंकिता रा जयसवाल यांच्या कडून संपूर्ण लेख मधे.... ©️®️

सावधान:  डेटा एंट्री जॉब फ्रॉड, वर्क फ्रॉम होम जॉब, जाणून घेऊया एडवोकेट अंकिता रा जयसवाल  जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती यांच्या   कडून संपूर्ण लेख मधे.... ©️®️
आजच्या लेखात आपण बघणार वर्क फ्रॉम होम आनी डेटा एंट्री जॉब फ्रॉड बददल त्याआधी तुम्ही माझ्या फेसबुक  पेज लीगल अवेयरनेस टॉक बाय एडवोकेट अंकिता आर जयसवाल ला भेट द्या, आनी माझ्या nyaykagyan.blogspot.com ला विजिट दया, 

मित्राणो कोरोना काळात अपल्याया माहित आहे की खूप लोकांची जॉब गेलेली आहेत, पण ते लोकं ऑनलाईन जॉब सर्च करत आहे आणि ऑनलाईन जॉब फ्रौड चे शिकार सुधा होत आहे, आजचे लेख हैं तुम्हा सगळ्यांसाठी जागरूकता करिता लिहीत आहे,
कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करा...
अशा जाहिराती बघितल्याच असतील...?नसतील तर बघा...
गुगलवर डाटा एंट्री जॉब असं काही तरी सर्च केलं की तुम्हाला मेसजेस येईलच. त्या लिंक वर क्लिक केले की एक वेबसाइट ओपन होईल. तिथे ज्या कंपनीची जॉब वेकैंसी आहे ती लिंक दिसेल. तिथे कामाचे स्वरुप दिसेल. प्रिंटेड पेजेस वरील मजकूर फक्त आहे तसा टाइप करायचा असतो. असंच काहीतरी सोपं काम असतं.
जर तुम्हाला काम आवडले तर तुम्ही फॉर्म भरुन द्यायचा. कामाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमच्या बॅंक खात्याचा तपशील द्यावा लागतो. तुमचा पोस्टल एड्रेस तर हवाच. शिवाय तुमचा एक फोटो अपलोड करावा लागतो. एका कागदावर तुमची सही करुन त्या सहीचा फोटो काढून png फॉर्मेट मध्ये अपलोड करावा लागतो. फॉर्म सबमिट करुन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की, काम झालं.
मग तुम्हाला एक काम दिले जाते. आठ दहा पाने आठ दिवसात टाईप करुन द्यायची असतात. तुम्ही ती तीन दिवसातच टाईप करून पूर्ण करुन देता. मग तुमचं काम त्याची एक्यूरेसी तपासली जाते. 90% एक्यूरेसी  नसेल तर ते रिजेक्ट केलं जातं. तुम्ही पुन्हा ते 100 %  एक्यूरेट करुन सबमिट करता. पुन्हा ते रिजेक्ट होते. तुम्ही मल्टीपल डिवाइसेज यूज केले आहेत असे कारण दिलेले असते. तुम्ही सबमिट केलेलं काम प्रत्येकवेळी रिजेक्ट होत राहतं. शेवटी वैतागून तुम्ही ते काम सोडून देता, किंवा मला तुमचे काम नको आहे असे त्या कंपनीला कळवता....
इथून पुढे खरा खेळ सुरू होतो. एके दिवशी तुम्हाला कंपनीच्या लॉयरचा फोन येतो. तुम्ही कंपनीशी केलेलं  कॉन्ट्रैक्ट ब्रीच केलेले आहे म्हणून तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो. तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि एक्यूरेट करुन न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान भरपाई रक्कम तो मागतो. एक तर काम पूर्ण करुन द्या, किंवा कंपनीचे झालेले नुकसान तरी भरुन द्या अशी त्या लॉयरची मागणी असते. तुम्ही एकतर कायदेशीर कारवाईला घाबरुन तीस चाळीस हजार भरुन टाकता किंवा मग सपशेल दुर्लक्ष तरी करता.
पैसे भरले तरी हे इथेच थांबत नाही. कंपनीसोबत तुम्ही केलेले अग्रीमेंट तुम्हाला पाठवले जाते. त्यात अनेक अटी व शर्ती असतात. तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर अकरा महिन्याचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील अशी एक शर्त तुम्ही मान्य केलेली असते. कंपनी तुमच्याकडे पाच ते दहा लाखाची मागणी करते. तुम्ही अ‍ॅग्रीमेंट लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करून हे अ‍ॅग्रीमेंट कंपनीने अस्तित्वात आणलेले असते...
कायदेशीर कारवाईच्या भितीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा मग तुम्ही दुर्लक्ष करता.. मग आता तुमच्या नावे दाखल केलेल्या एफ आई आर. ची कॉपी तुम्हाला पाठवली जाते. 420 सह आयपीसी मधली ब्रिच ऑफ   अग्रीमेंट  ची कलमे लावून कुठल्यातरी दूरच्या शहरात तुमचे विरुद्ध एफ आय आर दाखल केलेला आहे असे तुम्हाला दाखवले जाते. कंपनीचा लॉयर तुम्हाला सतत तडजोड करुन लम सम अमाऊंट भरा मी प्रकरण मिटवून टाकतो असा तगादा लावत असतो. तुम्ही वैतागून निम्मी आर्धी रक्कम भरुन प्रकरण मिटवून टाकता.  चार पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता.
हे प्रकरण संपता संपत नाही, कारण तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा ते कुठेही कसाही गैरवापर करुन ते तुम्हाला लुबाडू शकतात. पण ही वेळ येवू द्यायची नसेल तर एक मोफत सल्ला.. इझी मनी च्या नादी लागू नका. सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही. तुम्हाला महिना पन्नास हजार देण्यापेक्षा दहा पंधरा हजारात ते एखादा टायपीस्ट कामाला ठेवू शकत नाही का...?
तुमच्या सोबत असे काही घडले असेल तर एफ आय आर द्या, सायबर सेल ला रिपोर्ट द्या, 
फ्रॉड्स चे स्वरूप प्रत्येक वेळी नवीन असेल. पण सगळ्यात एकच समान असते ते म्हणजे अमिष. या अमिषाला बळी पडायचे की नाही..? हे तुमच्याच हातात असते...
तेंव्हा काळजी घ्या सावध राहा...
साइबर कंसलटेंसी साठी मला माझ्या फेसबुक पेज का मैसेज करूंन सांगू सकता, लेख आवडला असेल तर कॉमेंट्स मधे सांगा आणि शेअर करा.

1 टिप्पणी:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages