तुम्ही सुद्धा रम्मी गेम खेळत असाल तर रहा सावधान? रमी गेम बाबत जाणून घ्या आजच्या लेक मध्ये एडवोकेट अंकिता जयस्वाल सायबर तज्ञांकडून.... - न्याय का ज्ञान

Legal & Social Awareness

Breaking

Home Top Ad

Legal Awarness Talk by Adv. Ankita R Jaiswal fb page, nyaykagyan.Blogspot.com

Post Top Ad

Responsive Ads Here

कुल पेज दृश्य

मंगलवार, 8 अगस्त 2023

तुम्ही सुद्धा रम्मी गेम खेळत असाल तर रहा सावधान? रमी गेम बाबत जाणून घ्या आजच्या लेक मध्ये एडवोकेट अंकिता जयस्वाल सायबर तज्ञांकडून....

ऑनलाइन रमी गेम खेळत असाल तर रहा सावधान या आजच्या आलेख मध्ये जाणून घ्या ऑनलाईन रमी गेम बाबत एडवोकेट अंकिता जयस्वाल BA,LLB,PGDHR, LLM (Cyber Law) वरूड, जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती, हायकोर्ट नागपूर यांच्याकडून पुढील लेख मध्ये....@ copyright.

लॉकडाऊन च्या काळात सगळेच घरी होते, या कालावधीत मोबाईल ,इंटरनेट ऑनलाईन गेम, चा वापर बऱ्याच प्रमाणात वाढला त्यामुळे ऑनलाइन गुन्हे सुद्धा घडले, लॉकडाऊन पासून प्रत्येक जण आर्थिक तंगीचा शिकार झाले त्यामुळे आर्थिक व्यवसायाला प्रलोभन देणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्मला गेम सुद्धा वाढले, तसेच ऑनलाइन जॉब , वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन गेमिंग मध्ये कमवा लाखो रुपये ऑनलाईन लॉटरी मध्ये कमवा करोडो रुपये या प्रकारचे सायबर क्राईम सुद्धा दहा पटीने वाढलेत. त्यातील एक प्रकार म्हणजे ऑनलाइन गेमिंग आणि तीन पत्ती ऑनलाईन लुडो व त्यामधील फेमस असा प्रकार म्हणजे रमी गेम याने तर धुमाकूळ घातला.
आजकालच्या युवकांना लवकरात लवकर पैसे कसे कमवता येणार यावर त्यांचा जास्त कल असतो, त्यामुळे आज कालची युवक हे ऑनलाईन जुगार गेमिंग चे शिकार होत चालले आहेत सुरुवातीला जंगली रमी  खेळणाऱ्यांना एक ते दोन हजार रुपये सहज भेटतात त्यानंतर या गेम मध्ये लोक गुंतत जातात व ते कसे प्रलोभनाला बळी पडतात त्यांचे त्यांनाच कळत नाही, तर ते लोक इतर नातेवाईकांना पैसे मागतात किंवा बँक लोन उधार घेतात किंवा आपल्या स्वतःचे जमीन सुद्धा विकून देतात हे सर्व केल्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाही तर ते आत्महत्या सुद्धा करतात असे प्रकार सुद्धा समाजात घडलेले आहेत ते फक्त ऑनलाइन गेम मुळेच....
आजच्या लेख मध्ये आपण बघणार आहोत ऑनलाइन रमी गेम बाबत त्याआधी तुम्ही माझ्या फेसबुक पेज लीगल अवेअरनेस टॉक बाय एडवोकेट अंकिता रा जयस्वाल या पेजला फॉलो आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला सायबर क्राईम बद्दल लेटेस्ट अपडेट माहिती पडेल आणि तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला मला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता काही सायबर क्राईमशी रिलेटेड सल्ला लागेल तर तुम्ही तिथे मला मागू शकता तसेच माझ्या या लेख च्या खाली कमेंट्स मध्ये आपले मनोगत व्यक्त करू शकता.

मी आज आपण सर्वांना आवाहन करते की अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले जीवन वाचवा, सायबर सुरक्षित रहा, कित्येक मुलांचे पालक हे मला भेटले व माझ्याकडून सल्ला सुद्धा घेतलेला आहे, माझ्याजवळ तर एक केस होती त्यात मुलाने वडिलांकडून 21 लाख रुपये फक्त रमी गेम खेळण्यासाठी करिता घेतलेले होते शेवटी मला पालकाकडून मुलाला लीगल नोटीस पाठवावी लागली या सर्व कारणावरून तुम्हाला आवाहन करते की कोणत्याही जुगार अथवा रमी गेमला बळी पडू नका आपले जीवन उद्ध्वस्त करू नका, पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचे  ऑनलाइन गेम खेळायला देऊ नये तसेच आपल्या मुलांना कष्ट करून पैसे कमवणे शिकवावे व मुलांना अशा ऑनलाइन प्रकारच्या गेम पासून सावध करावे, असेआवाहन एडवोकेट अंकिता जयस्वाल सायबर तज्ञ नी केले आहेत.

केरळ हायकोर्टाने ऑनलाइन रमीला कौशल्या संबंधित खेळ म्हणत त्यावर बंदी घालने हा असंवैधानिक असल्याचे म्हटले कोर्टाने म्हटले की रमी सारख्या पैशासाठी खेळल्या जाणाऱ्या कौशल्याच्या ऑनलाईन गेम वर बंदी घालने म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे त्यानंतर याचिका कर्त्यानी केरळ सरकारच्या आदेशाला आव्हान दिले होते व सरकारने केरळ गेमिंग कायदा 1960 च्या तरतुदी अंतर्गत राज्यात ऑनलाइन रमीवर बंदी घातली होती.
मा. सुप्रीम कोर्टाने सुद्धा गेमिंग हे कौशल्याचा प्रकार असल्याचे मान्य केले होते कोर्टात याचिकाकर्त्यांनी आंध्र प्रदेश विरुद्ध के सत्यनारायण आणि के आर लक्ष्मण आणि तामिळनाडू राज्य आणि इतर मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा संदर्भ दिला होता या निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केले होते रमी हा कौशल्याचा खेळ आहे, म्हणून राज्याचा कायदा लागू होत नाही, तसेच या खेळांमध्ये यश पूर्णपणे कौशल्यावर अवलंबून आहे, त्यामुळे जुगार मानता येणार नाही यासाठी रमीवर राज्याचा जुगार आणि गेमिंग कायद्याअंतर्गत बंदी घालता येणार नाही.

परंतु आजही टेक्नॉलॉजी इंटरनेट इतके  वाढले असून सुद्धा आपल्या भारतात कोणताही ऑनलाईन गेम संबंधित कायदा अस्तित्वात नाही जे कायदे जुगार गेमिंग बद्दल आहे ते सर्व जुने कायदेच आहेत जुने कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याची आवश्यकता आहे किंवा नवीन कायदे बनवण्याची गरज आज भासलेली आहे.
तुम्ही ऑनलाईन गेम रमी खेळत असाल तर सावध राहा एका व्यक्तीने गेमिंग मध्ये आयुष्याची सर्व कमाई गमावली एवढेच नाही तर चार बँक चे लोन घेऊन सुद्धा तो ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरवून बसला आहेत काही लोकांनी तर या गेममुळे आत्महत्या सुद्धा केलेले आहेत, कोणी लाखो तर कोणी करोड रुपया रमी गेममुळे हरवून बसले आहेत अशाच एक गेम लॉकडाऊन च्या आधी आलेला होता ब्ल्यू व्हेल नावाचा त्या ब्लू व्हेल नावाच्या गेम ने भरपूर युवकांनी बालकांनी आत्महत्या केलेल्या होत्या,
आज-काल माणसं टेक्नॉलॉजी हाताळत नाही तर टेक्नॉलॉजी ही माणसाला हाताळायला लागलेली आहे म्हणून कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका व आपले कष्टाचे पैसे फालतू ऑनलाइन गेम मध्ये जुगारांमध्ये उडवू नका ,तसेच आई-वडिलांनी सुद्धा मुलांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन गेमिंग पासून बचावून ठेवले पाहिजे, जेणेकरून मुले प्रलोभनाला बळी पडणार नाही या गेम मध्ये कोणी कर्ज घेतले तर कोणी जमीन किंवा घर विकले, सुरुवातीला तुम्हाला थोडे पैसे मिळत असतील पण शेवटपर्यंत तुम्ही या गेम मध्ये फक्त हारता म्हणून प्रलोभनाला बळी न पडता या सर्व कारणावरून तुम्ही स्वतःला वाचविले पाहिजे तसेच अशा ऑनलाइन गेमिंग वर काही सायबर अपराधी सायबर अपराध करण्यासाठी तुम्हाला शिकार बनवतात व तुमच्या समक्ष फेक गेमच्या वेबसाईट आणतात त्या फेक गेमच्या वेबसाईट मुळे तुमच्या मोबाईल मध्ये वायरस येतो व तुमचे बँक अकाउंट सुद्धा खाली होते हे सर्व प्रकार समाजात घडत आहे त्यासाठी मी जागरूकता या दृष्टीने आजचे लेख लिहिलेले आहेत या लेख बद्दल आपले प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा आणि प्रत्येकांसोबत हा लेख शेअर करा ज्यामुळे प्रत्येक माणूस हा समाजात जागरूक असायला हवा.
मात्र हे प्रकार रोखण्यासाठी कायदेच अपुरे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ नुसार अटक आरोपींना पोलिस कोठडीही मिळत नाही. तीन महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. जुगाराची पद्धत बदलली आणि जुगार खेळविणाऱ्या आरोपीकडून खुबीने तंत्रज्ञानचा वापर केला जातो. अशा स्थितीत कायद्यातील तरतुदी बदलणे महत्त्वाचे आहे. डिजीटल क्रांती अन कुचकामी कायदेराज्यात महाराष्ट्र लॉटरी नियंत्रण कायदा, महाराष्ट्र (मुंबई) गेम प्रतिबंध कायदा १८८७, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (१८८७), महाराष्ट्र हातभट्टी दादा, झोपडपट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार धोकादायक कायदा (एमपीडीए १९८१) हे सगळे प्रचलित कायदे जुने झाले आहेत.
ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऑनलाईन गेम खेळता त्या ऑनलाइन कंपनी सुद्धा तुम्हाला शेवटी म्हणतात की ऑनलाईन गेम हा स्वतःच्या कौशल्यावर खेळावा याच्या कारणीभूतास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार.

मला आजचा लेख कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा लेख प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा जेणेकरून सर्व लोकांमध्ये जागरूकता व्हायला हवी.
कोणत्याहीप्रकारच्या सायबर क्राईम ची कंप्लेंट करण्यासाठी 1930 हा टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर सबक्रांशी रिलेटेड कंप्लेंट फाईल करावी.
टीप: वरील लेख हा लोकांना जागरूक करण्याच्या हेतूने लिहिलेला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages