मूली खरोखरच सुरक्षित आहेत का? - न्याय का ज्ञान

Legal & Social Awareness

Breaking

Home Top Ad

Legal Awarness Talk by Adv. Ankita R Jaiswal fb page, nyaykagyan.Blogspot.com

Post Top Ad

Responsive Ads Here

कुल पेज दृश्य

सोमवार, 14 दिसंबर 2020

मूली खरोखरच सुरक्षित आहेत का?

अ‍ॅड.  अंकिता आर जयस्वाल दिवाणी व फौजदारी न्यायालय वरुड.  जिल्हा अमरावती.
 मुली खरोखर सुरक्षित आहेत का?  

बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये फास्टट्रॅक न्यायालये आणि दिशा सारख्या कायद्यांची गरज नाही का?  

भारतीय संस्कृतीमध्ये मुलींना मा दुर्गा काली व सरस्वती लक्ष्मी या रुपात पुजल्या जाते तेच दुसरीकडे मुलींवर दिवसेंदिवस बलात्कार व मुलींना जाळणे अशा भयंकर अपराध केला जातो. असे का बर होत असेल? खरोखरच समाजात राहणाऱ्या माणसांना त्यांची मानसिकता बदलण्याची गरज नाही का?

निर्भया प्रकरण, हैदराबाद सामूहिक बलात्कार, हाथरस प्रकरण अशा अनेक घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अलीकडेच आठ दिवसांत दोन भयंकर गुन्हे घडले आहेत, बीड जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशीची पहिली घटना जिथे मध्यरात्री एक हैवणाने पेट्रोलने मुलगी जाळली, त्या मुलीला जगण्याचा अधिकार नव्हता का?  दुसरी घटना ही नरखेड तालुक्यातील १३ वर्षाच्या मुलीवर दुष्कर्म केल्याची दुसरी घटना, त्या १३ वर्षाच्या मुलीला तिच्या भविष्याबद्दल माहितीही नाही, महाराष्ट्रात या दोन्ही ठिकाणी दोन घटना घडल्या. मुलींनी किती वेळा स्वत: चा बळी द्यावा?किती वेळा त्यांनी या कृत्यांचा सामना करावा?  मुलींना या समाजातून न्याय कधी मिळाला?  मुलीही या समाजाचा एक भाग आहेत, माणूस हा विसरला आहे का?  असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत, एकीकडे मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना, मध्यरात्री मुलगी जाळली जाते आणि या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता नाही का?की असलेला कायदा बदलण्याची गरज नाही का?  माझ्या मते, दिशा कायद्या सारखे कायदे महाराष्ट्रात अमलात आणावे तसेच फास्ट ट्रॅक कोर्टाने लवकरात लवकर खटला निकाली काढावा, अशा भयंकर गुन्ह्यांमध्ये  आरोपीला फक्त फाशीची शिक्षा दिली पाहिजे व प्रकरण लवकरात लवकर निकाली काढले गेले पाहिजे, तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने कडक कायदा बनविला पाहिजे।
अशी अनेक प्रकरणे दिवसेंदिवस घडत असतात, त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे, दोन्ही घटनांमध्ये पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मी आशा करते.

माझ्याशी संपर्क साधायला माझ्या फेसबुक पेज Legal Awarness Talk by Adv. Ankita R.Jaiswal या पेजला भेट द्या. माझा लेख आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages